PPT कशी बनवावी ?
संगणकावर PPT कशी बनवावी ?
1) प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन करा.
2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .जर आपल्याला डिझाइनची स्लाईड हवी असेल तर स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला डिझाईनच्या स्लाईडचे विविध प्रकार दिसतील त्यातील एक निवडा.
3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुस-या बाॅक्समध्ये आपले नाव टाका.
4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा.
5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल मेनुबारमधील Insert या ऑप्शनवर क्लिक करा नंतर आपल्याला picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल.
6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वरील मेनूबारमधील insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा.
7) चला आता आपण साऊंड देऊ---
डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे आपण स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकतो.
8) आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला अॅनिमेशन दया अशाप्रकारे अनेक स्लाईड तयार करा.
यानंतर आपण स्लाईडला Animation देऊवर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईलस्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकतोअशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता.
No comments:
Post a Comment