माहिती व संप्रेषण टेक्नोलॉजी
माहिती व संप्रेषण टेक्नोलॉजीच्या युगात संगणकाचा वापर ही गोष्ट आता नविन राहिलेली नाही व अध्ययन-अध्यापन व शाळेचे कार्यालयीन कामकाज सुलभ व प्रभावी होण्यासाठी ते एक महत्वाचे साधन बनलेले आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मधील एक प्रमुख तत्व "विद्यार्थ्यांवरील माहितीचे ओझे कमी करणे हे आहे" माहितीचे ओझे कमी करुन शिकण्याची प्रकीया अधिक आनंददायी व अर्थपूर्ण करण्यासाठी संगणकाचा वापर कसा करावा,याचे नियोजन जाणीवपूर्वक करणे ही या काळाची गरज आहे.
शासन व लोकसहभागातून बहुतांश शाळांना आता संगणक उपलब्ध झालेले आहेत. ब-याच शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे व देखभाल दुरुस्तीसाठीही काही व्यवस्था केलेली आहे।नविन अभ्यासक्रमात शिकण्याच्या क्षमतांमध्ये 'संगणक व इंटरनेटचा वापर करता येतो' याचा समावेश आहे.शालेय अभ्यासक्रमात माहिती टेक्नोलॉजीचा अभ्यास हा स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे।केवळ स्वतंत्र अभ्यासविषय म्हणून नव्हे तर इतर सर्व विषयासाठी 'स्वयंअध्ययनाचे प्रभावी साधनतंत्र 'म्हणून याचे महत्त्व आहे.
संगणकाची वैशिष्ट्ये-
१)वेळ,पैसा,श्रम याबाबत किफ़ायतशीर
२)अचूकता
३)विलक्षण गती
४)स्मृती साठवून ठेवण्याची क्षमता व तत्परता
५)संपूर्ण नियंत्रण
६)गाफ़ीक यूझर फ़्रेंडली
७)मल्टिमीडिया प्रभाव
माहिती व संप्रेषण टेक्नोलॉजीचा शिक्षणात उपयोग-
१)विद्यार्थ्यांमध्ये माहिती व संप्रेषण टेक्नोलॉजीविषयक कौशल्य निर्माण करण्यासाठी
२)प्रत्येक विषयाच्या अध्ययनासाठी वर्गात आय.सी.ती.चा वापर करणे
३)पाठ्य साहित्यसंच संकेतस्थळांवर कायमस्वरुपी उपलब्ध करुन देण्यासाठी
४)अध्ययन प्रक्रियेत संगणक,इंटरनेटचा वापर जाणीवपूर्वक करण्यासाठी
५)गटचर्चा,चर्चासत्रे,प्रात्यक्षिक,सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम सर्वदूर पोहोचण्यासाठी,सी.ड़ी. डी.व्ही.डी उपग्रह प्रक्षेपणावर आधारित दूरभाष परिषद (Tele Conferencing) चित्रित परिषद (Video Conferencing) ई-लर्निंग यांसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी
शिक्षणक्षेत्रातील संगणकाच्या उपयुक्ततेची क्षेत्रे-
१)अध्ययन-अध्यापन
२)स्वयंअध्ययन
३)मूल्यमापन
४)संशोधन
५)मार्गदर्शन व समुपदेशन
६)ग्रंथालय सेवा
७)माहितीची निवड व संकलन
८)व्यवस्थापन व प्रशासन
संगणक अध्ययन-अध्यापन-
अ)ओफ़ लाईन व ओनलाईन-
सी.डी, व्ही.सी.डी, पेन ड्राइव्ह,एक्सटर्नल हार्ड डिस्क अशा साधनांचा वापर करुन शब्दकोश,विश्वकोश सारखे संदर्भग्रंथ,नमुना पाठ,प्रयोग कृती,विषयानुरूप चित्रपट,शिक्षकांनी स्वत: तयार केलेले प्रेझेंटेशन इत्या.चा उपयोग दैनंदिन अध्ययन-अध्यापनात रंजकता,स्पष्टता आणण्यासाठी होतो.याला संगणकाचा ओफ़ लाईन उपयोग असे म्हणता येईल.
आपला संगणक इंटरनेटला जोडून जगाच्या कोणत्याही भागात उपलब्ध असलेली अध्ययनोपयोगी सामग्री,अक्षररूप माहिती,चित्रे,नकाशे,चित्रपट,नमुना पाठ,पोवर पोईंट प्रेझेंटेशन्स,वेबसाईट्स,ईमेल चटकन उपलब्ध करुन घेता येते.याला संगणकाचा 'ओन लाईन'उपयोग म्हणता येईल.

No comments:
Post a Comment