नमस्कार व सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणा-या आपणा सर्वांचे स्वागत.

नवोपक्रम म्हणजे काय?

  नवोपक्रम म्हणजे काय?

"शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण जे काही परंपरेपेक्षा वेगळे करतो त्याला नवोपक्रम म्हणता येईल."

         थोडक्यात नवोपक्रमात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.

१)वेगळ्या वाटेने चालण्याचा आगळावेगळा विचार करणा-या शिक्षकांचा विचार कृतीत आणणे.
२)विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या समस्येवर स्वप्रयत्नाने उपाय शोधणे.
३)व्यवस्थापन, प्रशासन व पर्यवेक्षण करतांना वेगळ्या वाटेने जाऊन गुणवत्ता वाढविणे.
४)मरगळ दूर सारून उत्साहाने कार्यप्रेरित होणे.
५)नवीनता,यशस्विता,उपयुक्तता या निकषांवर आधारित उपक्रमांची आखणी करणे.
 

     नवोपक्रमाचे उद्देश -

१)शिक्षणातील अध्यापनाशी संबंधित क्षेत्रातील सद्य:स्थिती बदलून सुधारणा घडविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देणे.
२)शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रात केलेले नविनविन प्रयोग,प्रकल्प,संशोधने हे इतर शिक्षकांच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे.
३)प्राथमिक,माध्यमिक शिक्षणातील नवनवीन संकल्पना,विचारप्रवाह पद्धती,तंत्रे यांचा निरंतर शोध घेऊन शिक्षकांना उत्तेजन देणे. 

No comments:

Post a Comment