नमस्कार व सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणा-या आपणा सर्वांचे स्वागत.

Picsay App डाउनलोड करा.

चला तंत्रज्ञान शिकुया या भागात आज आपण शैक्षणिक व्ही.डी. ओ.साठी आवश्यक असणाऱ्या स्लाईड कशा तयार कराव्यात? हे आज आपण शिकणार आहोत.

आपण आपल्या मोबाईलमध्ये शाळेतील विविध फोटो घेतलेले  असतात या फोटोंच्या विविध स्लाइड  तयार करुन या तयार स्लाइडद्वारा व्ही.डी. ओ. क्लिप तयार करा व  आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्शवा.

स्लाइड तयार करण्यासाठी विविध App आहेत त्यापैकी आज आपण PicSay या App बद्दल माहिती घेणार आहोत.

*Picsay App डाऊनलोड करण्यासाठी खालील ब्लॉग लिंकवर क्लिक करा व App डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.shinycore.picsayfree&hl=en

स्लाइड कशा तयार कराव्यात आज आपण शिकुया------

1)app डाउनलोड करा.

2)या app ला ओपन करा.

3)app ओपन केल्यानंतर Get a Picture अशी सुचना असलेला बॉक्स दिसेल तेथे क्लिक करा.

4)नंतर आपल्यासमोर गॅलरी ओपन होईल तेथून एक इमेज सिलेक्ट करा

5)इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्या इमेजखाली चार ऑप्शन डिस्प्ले होतील त्यात Adjust, Effect, Sticker, Exposr.

6)Adjust या ऑप्शनमध्ये इमेजची साइज बदलने,क्रॉप करने,इमेज आपल्याला कोणत्या स्वरुपात हवी? उपलब्ध अनेक पर्यायांपैकी एक पर्याय सिलेक्ट करू शकतो.

7)Effect या ऑप्शनमध्ये आपण सिलेक्ट केलेल्या इमेजवर आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने Paint करू शकतो,Insert Picture या ऑप्शनद्वारा आपण सिलेक्ट केलेल्या इमेजमध्ये अजुन दूसरी इमेज Add करू शकतो,Pop  Colors या ऑप्शनमध्ये इमेजला आपण आपल्या पद्धतीने कलर इफेक्ट देऊ शकतो तसेच दिलेल्या विविध ऑप्शनमधून आपल्याला आवड़तील त्या पद्धतीने निवडून इमेज आकर्षक तयार करू शकतो.

8)Sticker या ऑप्शनमध्ये इमेज आकर्षक कशी दिसेल यासाठी विविध ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला आवडणारे ऑप्शन सिलेक्ट करुन इमेज आकर्षक तयार करू शकतो या ऑप्शनपैकी Title या ऑप्शनने आपल्याला इमेजवर नावे, वाक्य,शब्द मराठीत तसेच इंग्रजीत विविध कलरमध्ये टाईप करू शकतो.

9)Export---आपण पूर्णताहा तयार केलेली इमेज आपल्याला कुठे Export करायची आहे ते दिलेल्या ऑप्शन लिस्टमधून आपल्याला योग्य लोकेशन सिलेक्ट करा.

No comments:

Post a Comment