नमस्कार व सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणा-या आपणा सर्वांचे स्वागत.

मोबाईलवर व्हिडिओ क्लिप कशी तयार करावी?

मोबाईलवर व्हिडिओ क्लिप कशी तयार करावी? ते आपण जाणून घेऊ या.

     मित्रहो आज आपल्याला आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी खुप खुप प्रयत्नांची गरज आहे त्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या शाळेतील बाहेर शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी थांबवावे लागतील,त्यांची उपस्थिती टिकवावी लागेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्ता खुपच वाढवावी लागेल यासाठी आपले अध्ययन अध्यापन आनंददायी, मनोरंजक करण्याचे आपल्याला अधिकाधिक प्रयत्न करावे लागतील करिता आपल्याला डिव्हिडि प्लेयर,टीव्हि,साउंड सिस्टम,संगणक,मोबाईल यांची जास्तीत जास्त मदत घ्यावी लागेल असे मला वाटते.
                         यासाठी आपल्याला विविध विषय त्यातील घटक,काही संबोध स्पष्ट करण्यासाठी,आपली अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सोपी,आनंददायी व मनोरंजनात्मक करण्यासाठी आपल्याला आपल्या ANDROID मोबाईलवर व्हिडिओ क्लिप तयार करता येईल ते कसे तयार करावे ते जाणून घेउया.

सर्व प्रथम विविध विषयांसाठी आपल्या मोबाईल मध्ये एडिट केलेल्या ईमेज असाव्यात या ईमेज एडिट करण्यासाठी picscaypro say,picsart,baner maker,art studio इ.APP चा उपयोग करु शकतो.

सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ क्लिप तयार करण्यासाठी APP कोणकोणते हे माहिती असायला हवे.ते खालीलप्रमाणे-
mini movie,videocollage maker,clipmix,magic clip,video editer अजुनही इतर APP असतील तेंव्हा यापैकी आपण video editer या  APP चा आपल्याला अतिशय सोप्या पध्दतीने उपयोग करता येतो.
    

प्रथम प्लेस्टोर मधुन हे APP डाउनलोड करा


वरिल ईमेज मध्ये दिसतेय ते APP डाउनलोड करा

APP डाउनलोड झाल्यानंतर त्यास ओपन करा


APP ओपन केल्यानंतर वरिल ईमेजमध्ये दर्शविल्याप्रमाने क्लिक करा

व्हिडिओ एडिटवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे विविध फ़ोटो अल्बम दिसतील

या विविध फ़ोटो अल्बम मधून जे जे फ़ोटो हवे असतील ते निवडा

तयार झालेल्या व्हिडीओ क्लिपला तुम्हाला आवडत असलेली थीम निवडा

तयार झालेल्या व्हिडिओ क्लिपला फ़िल्टर करा

तयार झालेल्या व्हिडीओ क्लिपला तुमच्या मुजिक अल्बममधुन योग्य असे गाणे निवडून संगीत द्या
याप्रमाणे हि व्हिडीओ क्लिप तयार झाल्यानंतर माय व्हिडिओ येथे क्लिक करुन आपण हि क्लिप पाहू शकतो.

जर आपणास Laptop किंवा Desktop मध्ये व्हिडिओ क्लिप तयार करावयाची असल्यास पुढील सोफ़्टवेअर डाउनलोड करा.
 avs4u या वेबसाइट वरुन camtasiastudio हे सोफ़्टवेअर डाउनलोड करा.


No comments:

Post a Comment